दिव्यांग कल्याण कक्ष
जिल्हा परिषदेकडून त्यांच्या स्व-उत्पन्न निधीमधून जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने अर्थसहाय्य केले जाते. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने दिव्यांग लाभार्थ्यांना वैयक्तिक स्वरूपात झेरॉक्स मशील, पीठगिरणी, मिरचीकांडप यंत्र, शिलाई मशीन इ. वस्तु खरेदी करणेसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते. सदरचे अर्थसहाय्य हे शासनच्या धोरणानुसार थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये (DBT) वर्ग करण्यात येते. जि.प.कडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या या अर्थसहाय्यामधुन दिव्यांग लाभार्थी वस्तुची खरेदी करून व्यवसाय सुरू करतात. या व्यवसायामधुन दिव्यांग लाभार्थ्यांना चांगला रोजगार उपलब्ध झालेला आहे. दिव्यांग लाभार्थ्यांकडून जि.प. कडून राबविण्यात येणा-या या रोजगार निर्मितीच्या योजनांना मोठा प्रतिसाद प्राप्त होत आहे. या योजनेच्या लाभासाठी दिव्यांग व्यक्तींकडून मोठया प्रमाणात अर्ज/प्रस्ताव जिल्हा कार्यालयास प्राप्त होत असतात.
अधिक माहितीदिव्यांगाचे प्रकार
महाराष्ट्र शासनाकडून २१ प्रकार या मध्ये समाविष्ट केले गेले आहे
मानसिक मंदता
(Mental Reardation)
मानसिक मंदता म्हणजे, शिकण्यात आणि दैनंदिन कामकाज करण्यात अडचणी येणे
अधिक माहितीविकासात्मक विकलांगता
(Autism Spectrum Disorder)
ऑटिझम म्हणजे स्वमग्नता किंवा ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर
अधिक माहितीमेंदूशी संबंधित विकार
(Cerebral Plasy)
सेरेब्रल पाल्सी (CP) ही मेंदूला झालेल्या दुखापतीमुळे होणारी स्थिती आहे.
अधिक माहितीमानसिक रोगी
(Mental Illness)
मानसिक आरोग्याच्या विकारांमुळे व्यक्तीचे विचार, भावना आणि वागणे प्रभावित होते
अधिक माहितीश्रवण बाधित
(Hearing Impairment)
श्रवण बाधित म्हणजे ऐकण्याच्या क्षमतेत कमी होणे. श्रवणशक्ती कमी होण्याच्या पातळीला सौम्य ...
अधिक माहितीमूक नि:शक्ता
(Speech Impairment)
बोलताना शब्द मागे पुढे करणे त्यात तारतम्य नसणे यालाच वाचा दोष असे म्हणतात .
अधिक माहितीदृष्टी बाधित
(Blindness)
दृष्टीचा पूर्णपणे अभाव म्हणजेच पूर्ण दृष्टीहीन असणे, डोळे जन्मत बंद असणे, हलन चलन करताना...
अधिक माहितीअल्प दृष्टी
(Low Vision)
जवळच्या वस्तू स्पष्ट दिसणे आणि दूरच्या वस्तू अस्पष्ट दिसणे या स्थितीला अल्पदृष्टी किंवा मायोपिया
अधिक माहितीचलन नि:शक्ता
(Locomotor Disability)
लोकोमोटर डिसॅबिलिटी म्हणजे मस्क्यूकोस्केलेटल आणि/किंवा मज्जासंस्थेच्या आजारामुळे एखाद्या व्यक्तीला..
अधिक माहितीकुष्ठरोग
(Leposy Cured)
कुष्ठरोग हा बॅसिलस मायकोबॅक्टेरियम लेप्रीमुळे होणारा जीवाणूजन्य रोग आहे. हा रोग त्वचा, नसा, डोळे, नाक, घसा...
अधिक माहितीकमी उंची
(Dwarfism)
बौनेत्व म्हणजे वाढ मंदतेची स्थिती, ज्यामुळे प्रौढांची उंची असामान्यपणे लहान असते. बौनेत्वाचे अनेक प्रकार असून...
अधिक माहितीअसिड हल्ला पिडीत
(Acid Attack Victim)
ॲसिड हल्ल्यात बळी पडालेल्या व्यक्तीला होणारे नुकसान: चेहरा जळतो आणि त्वचेच्या ऊतींचे नुकसान होते
अधिक माहितीमांसपेशी दुर्विकास Muscular Dystrophy
We provide best care.It is safe & compassionate care at its best for everyone.
अधिक माहितीबौद्धिक नि:शक्तता
We provide best care.It is safe & compassionate care at its best for everyone.
अधिक माहितीमल्टीपल स्कलेरोसीस
Multiple Scheloresis
मल्टिपल स्क्लेरोसिस (एमएस) म्हणजे मज्जासंस्थेचा एक जुनाट विकार. हा एक ऑटोइम्यून डिसऑर्डर आहे
अधिक माहितीकंपवात रोग
(Parkinson's Disease)
पार्किन्सन रोग म्हणजे मेंदूचा एक दीर्घकालीन विकार आहे. या रोगात मेंदूतील पेशी हळूहळू निकृष्ट होत जातात.
अधिक माहितीहिमोफिलिया अधि रक्तस्त्राव
हिमोफिलिया ही एक दुर्मिळ अनुवांशिक स्थिती आहे जी रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या क्षमतेवर परिणाम करते.
अधिक माहितीथेलेसिमीया
थॅलेसेमियाचं मुख्य लक्षण म्हणजे अॅनिमिया. यामध्ये रुग्णाला सतत दम लागतो, थकवा येतो, श्वास अपुरा पडतो
अधिक माहितीस्कील सेल डिसीज
सिकल सेल ॲनिमिया हा सिकल सेल रोगाचा एक गंभीर प्रकार आहे. यामुळे असामान्य लाल रक्तपेशी निर्माण होतात....
अधिक माहितीबहु नि:शक्ता
(Multiple Disorder)
We provide best care.It is safe & compassionate care at its best for everyone.
अधिक माहितीयोजना आणि सुविधा
केंद्र सरकार
संचालित योजना
- दिव्यांग व्यक्तींना स्वैच्छिक कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी दीनदयाळ दिव्यांगजन पुनर्वसन योजना (डीडीआरएस योजना)
- जिल्हा अपंगत्व पुनर्वसन केंद्र (डीडीआरसी)
- अपंग व्यक्तींचे हक्क अधिनियम २०१६ च्या अंमलबजावणीसाठी योजना
- दिव्यांग व्यक्तींना साधने आणि उपकरणांच्या खरेदी आणि (जागेवर) बसवण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना
- दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण शिष्यवृत्ती
- दिव्यांग व्यक्तींसाठी राष्ट्रीय पाठ्यवृत्ती
- दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती
- प्रमाणरूप अपंगत्व असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती
- दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांत परीक्षेनंतर मिळणारी (मॅट्रिकोत्तर) शिष्यवृत्ती
- दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांत परीक्षा-पूर्व शिष्यवृत्ती
राज्य सरकार
संचालित योजना
- प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य
- दिव्यांग व्यक्तींसाठी राज्य शालांत परीक्षेनंतर मिळणारी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
- दिव्यांग व्यक्तींसाठी राज्य शालांत परीक्षा-पूर्व शिष्यवृत्ती
- विवाहविषयक प्रोत्साहन
- गुणवत्ता पुरस्कार
- दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य
- दिव्यांग व्यक्तींसाठी साधने आणि उपकरणांसाठी आर्थिक सहाय्य
- दिव्यांगांसाठी राज्य पुरस्कार योजना
फोटो संग्रह
बातमी/कार्यक्रम
यशोगाथा
जिल्हा परिषदेकडून त्यांच्या स्वउत्पन्न निधी मधुन जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थीना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने अर्थसहाय्य केले जाते. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने दिव्यांग लाभार्थ्यांना वौयक्तिक स्वरूपात झेरॉक्स मशीन, पीठगिरणी, मिरचीकांडप यंत्र, शिलाई मशीन इ.वस्तु खरेदी करणेसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते. सदरचे अर्थसहाय्य हे शासनाच्या धोरणानुसार थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये (DBT) वर्ग करण्यात येते. जि.प.कडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या या अर्थसहाय्यामधुन दिव्यांग लाभार्थी वस्तुची खरेदी करून व्यवसाय सुरू करतात. या व्यवसायामधुन दिव्यांग लाभार्थ्यांना चांगला रोजगार उपलब्ध झालेला आहे.
कु. सारांश प्रशांत ठाकूर
(मु.पो.मेढेखार,पोयनाड, ता.अलिबाग जि.रायगड)कर्णबधीर मुलांना ऐकण्याची क्षमता विकसीत होण्यासाठी अत्यंत खर्चिक स्वरूपाची अशी क्वॉक्लिअर इंम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य देखिल देण्यात येते. ही शस्त्रक्रीया 5 वर्षाच्या आतील मुलांवर केल्यास जास्त फायदेशीर आहे असे वौद्यकीय अहवालानुसार कळविलेले आहे. त्यानुसार या वर्षी सन 2024-25 मध्ये खालील दिव्यांग मुलास विशेष बाब म्हणून रक्कम रूपये 6,08,000/- अक्षरी सहा लाख आठ हजार मात्र लाभ मंजूर करण्यात आलेला आहे.
सन 2023-24 मध्ये दिव्यांगाना पुरविण्यात आलेल्या ई शॉप वाहनाचा वापर स्वयंरोजगारासाठी चांगल्या प्रकारे दिव्यांग लाभार्थी करत आहेत. या उपलब्ध करून दिलेल्या ई शॉप वाहनाच्या माध्यमातून दिव्यांगांना रोजगार निर्मिती देखिल सुरू झालेली आहे. त्यामध्ये काही लाभार्थ्यांनी छोटा खाद्य फुड मॉल (वडा पाव सेंटर), छोटे किरणा दुकान, इ. व्यवसाय सुरू केलेले आहेत.
श्री.कैलास अनंत जंगम
(मु.महादेववाडी ता.रोहा, जि.रायगड)रायगड जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कल्याण विभागाकडून दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी ई टेम्पो रिक्षा पर्यावरण स्नेही वाहन पुरविणे या योजनेअंतर्गत मला लाभ मिळालेला आहे जिल्हा परिषदेने त्यांच्या स्व उत्पन्नातून दिव्यांग व्यक्तींना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हाती घेतले ही योजना दिव्यांगांसाठी अत्यंत लाभदायक आहे या योजनेच्या माध्यमातून मला मिळालेल्या वाहनाचा उपयोग करून मी जनरल स्टोअर दुकान सुरू केलेले आहे या जनरल स्टोअर दुकानांमधून मला प्रत्येक दिवशी 200 ते 300 रुपयांचा रोजगार उपलब्ध होत आहे. सदरचे वाहन हे बहुउद्देशीय उपयोगी आहे.
श्री.निलेश बारक्या नाक्ती
(मु.वडवली, ता.श्रीवर्धन,जि.रायगड)रायगड जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कल्याण विभागाकडून दिव्यांग व्यक्तींना सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञान याकरिता अर्थसहाय्य स्कुटी पुरविणे या योजनेअंतर्गत मला लाभ मिळालेला आहे जिल्हा परिषदेने त्यांच्या व उत्पन्नातून दिव्यांग व्यक्तींना चलन वलन सोयीस्कर सुलभ होण्याच्या दृष्टीने हाती घेतलेली ही योजना दिव्यांगांसाठी अत्यंत मोलाची आहे