20 Feb 2026
जिल्हा परिषदेकडून त्यांच्या स्व-उत्पन्न निधीमधून जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने अर्थसहाय्य केले जाते. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने दिव्यांग लाभार्थ्यांना वैयक्तिक स्वरूपात झेरॉक्स मशील, पीठगिरणी, मिरचीकांडप यंत्र, शिलाई मशीन इ. वस्तु खरेदी करणेसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते. सदरचे अर्थसहाय्य हे शासनच्या धोरणानुसार थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये (DBT) वर्ग करण्यात येते. जि.प.कडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या या अर्थसहाय्यामधुन दिव्यांग लाभार्थी वस्तुची खरेदी करून व्यवसाय सुरू करतात. या व्यवसायामधुन दिव्यांग लाभार्थ्यांना चांगला रोजगार उपलब्ध झालेला आहे. दिव्यांग लाभार्थ्यांकडून जि.प. कडून राबविण्यात येणा-या या रोजगार निर्मितीच्या योजनांना मोठा प्रतिसाद प्राप्त होत आहे. या योजनेच्या लाभासाठी दिव्यांग व्यक्तींकडून मोठया प्रमाणात अर्ज/प्रस्ताव जिल्हा कार्यालयास प्राप्त होत असतात.
अधिक माहितीमहाराष्ट्र शासनाकडून २१ प्रकार या मध्ये समाविष्ट केले गेले आहे
मानसिक मंदता म्हणजे, शिकण्यात आणि दैनंदिन कामकाज करण्यात अडचणी येणे
अधिक माहिती(Autism Spectrum Disorder)
ऑटिझम म्हणजे स्वमग्नता किंवा ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर
अधिक माहितीसेरेब्रल पाल्सी (CP) ही मेंदूला झालेल्या दुखापतीमुळे होणारी स्थिती आहे.
अधिक माहितीमानसिक आरोग्याच्या विकारांमुळे व्यक्तीचे विचार, भावना आणि वागणे प्रभावित होते
अधिक माहितीश्रवण बाधित म्हणजे ऐकण्याच्या क्षमतेत कमी होणे. श्रवणशक्ती कमी होण्याच्या पातळीला सौम्य ...
अधिक माहितीबोलताना शब्द मागे पुढे करणे त्यात तारतम्य नसणे यालाच वाचा दोष असे म्हणतात .
अधिक माहितीदृष्टीचा पूर्णपणे अभाव म्हणजेच पूर्ण दृष्टीहीन असणे, डोळे जन्मत बंद असणे, हलन चलन करताना...
अधिक माहितीजवळच्या वस्तू स्पष्ट दिसणे आणि दूरच्या वस्तू अस्पष्ट दिसणे या स्थितीला अल्पदृष्टी किंवा मायोपिया
अधिक माहितीलोकोमोटर डिसॅबिलिटी म्हणजे मस्क्यूकोस्केलेटल आणि/किंवा मज्जासंस्थेच्या आजारामुळे एखाद्या व्यक्तीला..
अधिक माहितीकुष्ठरोग हा बॅसिलस मायकोबॅक्टेरियम लेप्रीमुळे होणारा जीवाणूजन्य रोग आहे. हा रोग त्वचा, नसा, डोळे, नाक, घसा...
अधिक माहितीबौनेत्व म्हणजे वाढ मंदतेची स्थिती, ज्यामुळे प्रौढांची उंची असामान्यपणे लहान असते. बौनेत्वाचे अनेक प्रकार असून...
अधिक माहितीॲसिड हल्ल्यात बळी पडालेल्या व्यक्तीला होणारे नुकसान: चेहरा जळतो आणि त्वचेच्या ऊतींचे नुकसान होते
अधिक माहितीWe provide best care.It is safe & compassionate care at its best for everyone.
अधिक माहितीWe provide best care.It is safe & compassionate care at its best for everyone.
अधिक माहितीमल्टिपल स्क्लेरोसिस (एमएस) म्हणजे मज्जासंस्थेचा एक जुनाट विकार. हा एक ऑटोइम्यून डिसऑर्डर आहे
अधिक माहितीपार्किन्सन रोग म्हणजे मेंदूचा एक दीर्घकालीन विकार आहे. या रोगात मेंदूतील पेशी हळूहळू निकृष्ट होत जातात.
अधिक माहितीहिमोफिलिया ही एक दुर्मिळ अनुवांशिक स्थिती आहे जी रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या क्षमतेवर परिणाम करते.
अधिक माहितीथॅलेसेमियाचं मुख्य लक्षण म्हणजे अॅनिमिया. यामध्ये रुग्णाला सतत दम लागतो, थकवा येतो, श्वास अपुरा पडतो
अधिक माहितीसिकल सेल ॲनिमिया हा सिकल सेल रोगाचा एक गंभीर प्रकार आहे. यामुळे असामान्य लाल रक्तपेशी निर्माण होतात....
अधिक माहितीWe provide best care.It is safe & compassionate care at its best for everyone.
अधिक माहितीसंचालित योजना
संचालित योजना
जिल्हा परिषदेकडून त्यांच्या स्वउत्पन्न निधी मधुन जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थीना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने अर्थसहाय्य केले जाते. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने दिव्यांग लाभार्थ्यांना वौयक्तिक स्वरूपात झेरॉक्स मशीन, पीठगिरणी, मिरचीकांडप यंत्र, शिलाई मशीन इ.वस्तु खरेदी करणेसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते. सदरचे अर्थसहाय्य हे शासनाच्या धोरणानुसार थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये (DBT) वर्ग करण्यात येते. जि.प.कडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या या अर्थसहाय्यामधुन दिव्यांग लाभार्थी वस्तुची खरेदी करून व्यवसाय सुरू करतात. या व्यवसायामधुन दिव्यांग लाभार्थ्यांना चांगला रोजगार उपलब्ध झालेला आहे.
कर्णबधीर मुलांना ऐकण्याची क्षमता विकसीत होण्यासाठी अत्यंत खर्चिक स्वरूपाची अशी क्वॉक्लिअर इंम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य देखिल देण्यात येते. ही शस्त्रक्रीया 5 वर्षाच्या आतील मुलांवर केल्यास जास्त फायदेशीर आहे असे वौद्यकीय अहवालानुसार कळविलेले आहे. त्यानुसार या वर्षी सन 2024-25 मध्ये खालील दिव्यांग मुलास विशेष बाब म्हणून रक्कम रूपये 6,08,000/- अक्षरी सहा लाख आठ हजार मात्र लाभ मंजूर करण्यात आलेला आहे.
सन 2023-24 मध्ये दिव्यांगाना पुरविण्यात आलेल्या ई शॉप वाहनाचा वापर स्वयंरोजगारासाठी चांगल्या प्रकारे दिव्यांग लाभार्थी करत आहेत. या उपलब्ध करून दिलेल्या ई शॉप वाहनाच्या माध्यमातून दिव्यांगांना रोजगार निर्मिती देखिल सुरू झालेली आहे. त्यामध्ये काही लाभार्थ्यांनी छोटा खाद्य फुड मॉल (वडा पाव सेंटर), छोटे किरणा दुकान, इ. व्यवसाय सुरू केलेले आहेत.
रायगड जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कल्याण विभागाकडून दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी ई टेम्पो रिक्षा पर्यावरण स्नेही वाहन पुरविणे या योजनेअंतर्गत मला लाभ मिळालेला आहे जिल्हा परिषदेने त्यांच्या स्व उत्पन्नातून दिव्यांग व्यक्तींना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हाती घेतले ही योजना दिव्यांगांसाठी अत्यंत लाभदायक आहे या योजनेच्या माध्यमातून मला मिळालेल्या वाहनाचा उपयोग करून मी जनरल स्टोअर दुकान सुरू केलेले आहे या जनरल स्टोअर दुकानांमधून मला प्रत्येक दिवशी 200 ते 300 रुपयांचा रोजगार उपलब्ध होत आहे. सदरचे वाहन हे बहुउद्देशीय उपयोगी आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कल्याण विभागाकडून दिव्यांग व्यक्तींना सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञान याकरिता अर्थसहाय्य स्कुटी पुरविणे या योजनेअंतर्गत मला लाभ मिळालेला आहे जिल्हा परिषदेने त्यांच्या व उत्पन्नातून दिव्यांग व्यक्तींना चलन वलन सोयीस्कर सुलभ होण्याच्या दृष्टीने हाती घेतलेली ही योजना दिव्यांगांसाठी अत्यंत मोलाची आहे